Kolhapur Religious Places : कोल्हापूर दर्शनाचा प्लॅन आहे ? मग या 10 धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या !
बिनखांबी गणेश मंदिर - गणेशाचे हे मंदिर भक्तांमध्येही खूप लोकप्रिय आहे. स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट कामामुळे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी वाढले आहे. विशेष म्हणजे या मंदिरात एकही खांब नाही म्हणूनच बिनखांबी मंदिर असे म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबाबाई मंदिर : अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस 7 किमी अंतरावर हे स्थान वसले आहे. बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे.
कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.
चिन्मय गणाधीश मंदिर - कोल्हापूरपासून १४ किमी अंतरावर असलेल्या चिन्मय गणाधीश मंदिरात गणेशाची सर्वात उंच मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येतात.
बाळूमामा मंदिर आदमापूर - महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, कोकणसह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर भुदरगड तालुक्यात आहे. श्री क्षेत्र आदमापूर हे बाळूमामांचे समाधीस्थान आहे.
नृसिंहवाडी - दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.
कणेरी मठ हे कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत.
जोतिबा - कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भौतिक ऐश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा देवस्थान हे कोल्हापूरपासून 17 किमीवर आहे.
गगनगिरी मठ - गगनबावडा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव आहे. हिरवेकंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. घाटाच्या तोंडाशी आहे गगनगड किल्ला आणि त्यावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ. तिथपर्यंत उत्तम गाडीरस्ता आहे.