Kolhapur News: आषाढीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई अन् दख्खनचा राजा जोतिबा सजले विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात
आषाढी एकादशी निमित्त श्री अंबाबाई मंदिरात आज देवीची श्री विठ्ठल-रुक्मिणी रुपात आकर्षक महापूजा बांधण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदख्खनचा राजा वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाचीही श्री विठ्ठल रुपात आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्राचीन मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ देत, चांगला पाऊस पडू दे, असे साकडे त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी घातले.
कोल्हापूरपासून 14 किमी अंतरावर असलेल्या राधानगरी रोडवर वाशी गावाजवळ असलेल्या नंदवाळला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून दररोज मुक्कामासाठी, वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा), रखुमाई नंदवाळेमध्येच असतात असं समजलं जातं.
या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे.
पुईखडी येथे ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा पार पडला.
यावेळी अनेक छोटी मुले विठुरायाचा गजर करत नामस्मरणात दंग झाली होती.