जोतिबा डोंगरावर खेट्यांची सांगता; चैत्र यात्रा 5 एप्रिलला होणार
जोतिबा डोंगरावर परंपरेनुसार खेट्यांची सांगता झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील सुमारे दोन लाख भाविकांनी आज डोंगरावर हजेरी लावली.
माघ पौर्णिमा ते फाल्गुन पौर्णिमेच्या पूर्वी येणाऱ्या रविवारी शेवटचा खेटा करण्याची परंपरा आहे.
यामध्ये कधी चार तर कधी पाच रविवार येतात. काही भाविक पाच खेटेही करतात.
शेवटच्या खेट्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील अनेक भाविकांनी पंचगंगा नदीकाठी स्नान करून डोंगराकडे गेले.
चांगभलंच्या जयघोषाने गायमुख परिसर दणाणून गेला.
डोंगरावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोतिबा देवाची चैत्र यात्रा 5 एप्रिल रोजी होत आहे
येत्या आठवड्याभरात यात्रेच्या तयारीस सुरुवात होईल.
यात्रेसाठी शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी, सासनकाठी प्रतिनिधी बैठक पार पडल्यानंतर अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत होईल.