Jyotiba Devasthan : येत्या रविवारपासून जोतिबाचा पहिला खेटा; डोंगरावर प्रशासनाकडून जय्यत तयारी
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या दर्शनाला रविवारी मोठी गर्दी झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौर्णिमा आणि रविवार एकत्र आल्याने मंदिरासह गावामध्ये यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
उन्हाच्या झळा बसत असताना भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.
दर्शन रांग मंदिराबाहेरील ठाकरे मिटके मार्गापर्यंत पोहोचली होती.
माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून जोतिबा खेटेला प्रारंभ होतो.
12 फेब्रुवारीला जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा होणार आहे.
यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे
कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असा पायी प्रवास करत रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते.
श्री अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन श्री जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते.
हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.
खेटे उत्साहात पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे