Jotiba Chaitra Yatra : अलोट गर्दी अन् चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर भक्तीचा महापूर
दख्खनचा राजा जोतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातून भाविकांनी डोंगरावर अलोट गर्दी केली आहे.
राज्यभरातून मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत.
मुक्तहस्ताने गुलालाची उधळण करत भाविक यात्रेत सामील झाले आहेत.
राज्यासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातून भाविक दाखल झाले आहेत.
मंदिर आणि डोंगर परिसर पूर्णत: गुलालात न्हाऊन गेला आहे.
जोतिबा यात्रेसाठी मंदिर रात्रभर सुरु राहणार आहे.
पायथा ते मंदिरापर्यंत केएमटीची भाविकांसाठी मोफत बससेवा उपलब्ध आहे.
ही यात्रा बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी पार्किंग व्यवस्था आणि दर्शन रांगांसाठी मोठी तयारी केली आहे.
यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मंदिरासह संपूर्ण गावात व घाट रस्त्यावर कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.