Kolhapur Rain Update: हवामान विभागाचा कोल्हापूरला आज रेड अलर्ट, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील तीन दिवसांचा अंदाज काय?
हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज (26 जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28 आणि 29 जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
30 जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पंचगंगा नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. आज (26 जुलै) दुपारी 3 वाजता पंचगंगा नदी राजाराम बंधारा पाणी पातळी 40 फुट 4 इंच इतकी आहे.
धानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ होऊन पंचगंगा नदी धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे.
आतापर्यंत 5 ( 3, 4, 5, 6 व 7 ) स्वयंचलित दरवाजे उघडली आहेत.