हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी; समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी कागलमध्ये ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मुश्रीफांना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांना ईडीच्या कारवाईबाबत माहिती मिळताच चांगलेच संतप्त झाले.
यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांनी थेट प्रवेशद्वारावजवळ येऊन निषेध केला.
मुश्रीफ यांच्या समर्थनासाठी कागलसह कोल्हापूरहून कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
मुश्रीफ यांच्या पत्नीला यावेळी भावना अनावर झाल्या.
सारखं येण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून संपवा, असा शब्दात मुश्रीफांच्या पत्नीनं प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ अधिवेशनासाठी मुंबईत असून ते कागलमध्ये नाहीत.
भैय्या माने यांनी समर्थकांसह प्रवेशद्वारात ठिय्या मांडला आहे.
ईडी कारवाई अगोदरच सोमय्यांना माहिती कशी होते? अशी विचारणा भैय्या माने यांनी केली आहे.
मुश्रीफांवर झालेल्या कारवाईचा राष्ट्रवादीनं तीव्र शब्दात निषेध केला आहे.