अंबाबाईच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप; अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची आरास
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर देवीच्या गाभाऱ्यात हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
अक्षय तृतियेला देवीस अनेक भाविकांनी हापूस आंबा अर्पण केला.
भाविकांकडून आलेल्या सुमारे 500 ते 600 आंब्यांची देवीला आरास करण्यात आली
ही आरास पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
त्यामुळे अंबाबाईच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप प्राप्त झाले.
देवीची आज हिंदोळ्यावर बसलेल्या स्वरुपातील पूजा बांधण्यात आली.
मयूर मुनीश्वर, सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
गेल्या काही दिवसांपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सलग गर्दी सुरु आहे.
वाढत्या उन्हाच्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शनरांगेवर मंडप, मंदिर आवारात ध्यान तसेच आराम करण्यासाठी समितीने मंडप उभारला आहे.