Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा सर्जिकल स्ट्राईक; शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार!

संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिल्यानंतर ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा पडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्याने शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार आहे.

वनविभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत
पक्की बांधकामे 15 दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, अशी सूचना उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केली आहे.
पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत 20 हून अधिक अतिक्रमणे आहेत.
गडावर शासकीय जागेत आणि पायथा परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत.
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे.
या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.
विशाळगड ग्रामस्थांनीही अतिक्रमण केल्याबाबतची कबुली देत अतिक्रमण काढण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.
सोमवारी मंत्रालयात अतिक्रमण काढण्यासंदर्भाची चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार कृती आराखडा केला जाणार आहे.