जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात हजारो कर्मचारी एकवटले
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा आमदार सतेज पाटील नेतृत्वात आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.
मोर्चात शेकडो शासकीय, निमशासकीय कर्मचारी सहभागी झाले.
कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा मोर्चात सहभागी झाले.
आमदार सतेज पाटील यांनी येत्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली.
कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून जाहीर करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला.
संघटना निर्णय होत नाही तोपर्यंत जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल असेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे राज्य सरकारने जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
मात्र, निर्णय घेत असताना ताळेबंदचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सरकारने लक्षात घेतलं पाहिजे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है, असा इशारा आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिला.