Kolhapur News: लोकसभा निवडणुकीसाठी बंगळुरुहून कोल्हापुरात 2 जूनला ईव्हीएम यंत्रे आणणार
दोन जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळूरहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत. यासाठी कर्मचारी व पोलिसांचे पथक पाठवले जाणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
Kolhapur Loksabha Election
1/10
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारी सुरु आहे.
2/10
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे
3/10
2 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 580 ईव्हीएम बंगळुरुहून कोल्हापुरात आणली जाणार आहेत.
4/10
यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
5/10
कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.
6/10
कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघासाठी बंगळूरमधील 'बेल' कंपनीची 1 हजार 580 ईव्हीएम मंजूर आहेत.
7/10
कोल्हापुरात 2 जूनला ही यंत्रे आणण्यात येणार आहेत.
8/10
तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक 30 मे रोजी बंगळुरुत पाठवण्यात येणार आहेत.
9/10
दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून विद्यमान खासदार आगामी निवडणुकीसाठी रिंगणात असतील.
10/10
महाविकास आघाडीकडून दोन जागांवर कोण असणार? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे, हातकणंगलेमधून राजू शेट्टी रिंगणात असतील.
Published at : 18 May 2023 12:26 PM (IST)