Kolhapur News: कोल्हापुरात 4 जुलैपासून ईव्हीएम तपासणी; जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेची तयारी
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या कंट्रोल युनिट (सीयू), बॅलेट युनिट (बीयू) आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण 17 हजार 398 मतदान यंत्रांची फर्स्ट लेव्हल चेकिंग 4 जुलैपासून होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात सुरू होणार आहे.
त्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून हे काम महिनाभर चालणार आहे.
लोकसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जरी एकत्र झाल्या, तरी त्याकरिता आवश्यक असणारी ईव्हीएमची उपलब्धता प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात असलेल्या 17 हजार 398 मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यावरील पडताळणी करण्यात येणार आहे.
याकरिता भारत निवडणूक आयोगाने कंपनीच्या आठ इंजिनिअर्सची नियुक्ती केली आहे.
यासह 40 अकुशल कामगार, जिल्हा निवडणूक विभागाचे पाच कर्मचारी यांच्या मदतीने महिन्याभरात सर्व ईव्हीएमची तपासणी पूर्ण केली जाणार आहे.
या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे.
मतदान यंत्रे तपासणीचे काम पोलिस बंदोबस्तात होणार आहे.
त्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.