Kolhapur: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्याने जिल्हा बँकेला पोलीस छावणीचे स्वरुप!
शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील सेवा संस्थेला कर्जपुरवठा दाखला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारा बँकेकडून मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.
दाखला देणार नसाल, तर आज (28 जून) दुपारी तीन वाजता जिल्हा बँकेसमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता.
यानंतर कोल्हापूर पोलिसांकडून आंदोलनाची धडकी तगडा बंदोबस्त जिल्हा बँकेच्या दारात तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँक परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आलं आहे
अकिवाटमधील सेवा सोसायटीला कर्जपूरवठा करण्यासाठी जिल्हा बँकेकडून दाखला मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
स्वाभिमानीकडून उपोषण सुरु करण्यात आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री उपोषणकर्त्यांना ताब्यात घेऊन मार्केट यार्डात ठेवले आहे.
रात्री दोन वाजता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बँक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीस राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेत बँक आणि जिल्हा प्रशासनाने घेत रात्रीपासून यंत्रणा गतिमान केली.