Raju Shetti: सरकारची भूमिका संशयास्पद, बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करा; राजू शेट्टींचे राष्ट्रपतींना पत्र
राष्ट्रीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा सरकारने त्यांना क्लीनचीट द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्या्ंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कुस्तीबाबत देशपातळीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती खेळाडू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत.
असे असूनही केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेमुळे देशाची आणि विशेषत: कुस्ती क्षेत्राची बदनामी झाली आहे. ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
असे असूनही केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घटनेमुळे देशाची व विशेष करून कुस्ती क्षेत्राची बदनामी झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे
ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जू शेट्टी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.
बृजभूषण हे कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याविरोधात बोलण्यास धाडस कुणी करत नसावे. ब्रीजभूषण यांच्यावर कडक कारवाई करावी; अन्यथा सरकारने त्यांना क्लीनचीट द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. तेव्हा कोल्हापूरसह राज्यातील पैलवानांनी एकमुखाने या महिला कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी समोर यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
सरकारची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोल्हापूरसह राज्यातील पैलवानांनी एकमुखाने या महिला कुस्तीपटूंच्या पाठिंब्यासाठी समोर यावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.