Ajit Pawar on Dilip Walse Patil : तर मग दिलीप वळसे पाटलांची नार्को टेस्ट करा, मग कळेल! थेट अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar on Dilip Walse Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांच्या अलिप्त राहण्यावरून जाहीर भाष्य केलं आहे.

Continues below advertisement

Ajit Pawar on Dilip Walse Patil

Continues below advertisement
1/10
मंत्री दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने ते सध्या घरीच विश्रांती करत आहेत.
2/10
लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील दुखापतग्रस्त झाल्याने अजित पवार गटाला सुद्धा धक्का बसला आहे.
3/10
लोकसभा निवडणुकीत ते पूर्णत: अलिप्त असल्याने भूवया उंचावल्या आहेत.
4/10
या सर्व पार्श्वभूमीवर विचारण्यात आले असता अजित पवार यांनी मिश्कील उत्तर दिले.
5/10
दिलीप वळसे हे शरीराने आणि मनाने कुठं आहेत, हे सर्वांना कळावं यासाठी आपण त्यांची नार्को टेस्ट करुया, मग कळेल ते शरीराने कुठं अन मनाने कुठं आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
Continues below advertisement
6/10
दुसरीकडे, छगन भुजबळही प्रचारात दिसत नसल्याने अजित पवार यांना विचारण्यात आले.
7/10
भुजबळ साहेबांची थोडी तब्येत नरम आहे. शेवटी तब्येत चांगली असायला हवी, तब्येत चांगली असल्यावर बाकी सगळ्या गोष्टी करता येतात, असे पवार यांनी सांगितले.
8/10
संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. न्याय व्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून, तो निर्णय अंतिम मानायचा असतो, असे ते म्हणाले.
9/10
काही लोक यावर याचिका दाखल करतात. मात्र. न्याय व्यवस्था त्यावर योग्य तो निर्णय घेतात आणि तो आपण मान्य करायचा असतो, असेही त्यांनी सांगितले.
10/10
बारामतीच्या निवडणूक आयोगाकडे झालेल्या तक्रारीवर ते म्हणाले की, दोघांनीही एकमेकांवर तक्रारी केल्या आहेत. अशा तक्रारी होत असतात त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, पीडीसीसी बँक उघडी असेल तर चौकशी करावी सीसीटीव्ही पाहून कारवाई करावी, असे ते म्हणाले.
Sponsored Links by Taboola