Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरातील भाविकही लोकराजा शाहू महाराजांसाठी 100 सेकंद स्तब्ध

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लोकराजा शाहू महाराजांना स्मृतीदिनी मानवंदना देण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अंबाबाई मंदिरातही आलेल्या भाविकांनी सुद्धा लोकराजाला 100 सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले.

मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, इतिहास संशोधक, अभ्यासक, नागरिकांनी उपक्रमात उत्फूर्तपणे सहभाग घेतला.
त्यामुळे शाहू महाराजांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले
गावे, संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक, नागरिकांकडून ठिकठिकाणी लोकराजाला अभिवादन करण्यात आले.
सर्व प्रकारची वाहतूक थांबवून कोल्हापूर स्तब्ध झाले.
शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालये, शैक्षणिक व विविध संस्थांमध्ये अभिवादन करण्यात आले.
गतवर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.
शिवाजी विद्यापीठातही लोकराजाला वंदन करण्यात आले.
रंकाळ्याच्या काठावरही 300 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवंदना दिली.