P. N. Patil : पी. एन. पाटील यांच्या पार्थिवावर सडोली खालसात अंत्यसंस्कार; अशी असेल पार्किंग व्यवस्था

प्रदेश उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे आज निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हळदी पेट्रोल पंपापासून ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणापर्यंत रस्ता पूर्ण रिकामा असणार आहे.
शासकीय व व्हीआयपी गाड्या सडोली खालसा बागेत व दत्त मंदिर गायरान परिसर असतील.
हिरवडेपासून राधानगरीतील वाहने - हिरवडे रोड ( कांजरभाट परिसरात लावणे.)
बाचणी शिरोली सांगरुळ मार्गे येणारी वाहने - बाचणी शिरोली रोड. (पांडुरंग हॉल पासून मागे बाचणीच्या खिंडीपर्यंत थांबणार)
रा.बा. पाटील विद्यालय सडोली व विद्यामंदिर सडोली या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे.
कारभारवाडी - आरे रोड पूर्णपणे पार्किंगसाठी रिकामा राहील. (रस्त्याच्या बाजूला गाड्या लावाव्यात)
हळदी पासून राधानगरी पर्यंत येणारी वाहने सडोली मध्ये न येता हळदी कुर्डू रोड ला पार्किंग करावीत.
सडोली खालसामध्ये दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.