सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील कणेरी मठावर सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव होत आहे.
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
येणाऱ्या 7 दिवसांमध्ये लाखो लोक या लोकोत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, माणिक पाटील-चुयेकर आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
गंगा नदीच्या आरतीप्रमाणेच या ठिकाणी पंचगंगा नदी आरतीचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी काडसिध्देश्वर स्वामीजींना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाद्वारे पाणी, ध्वनी प्रदुषण टाळूया, पाण्याच्या, उर्जेचा अतिरिक्त वापर टाळूया, गरजेपूर्तेच वाहने वापरूया, माती आणि वृक्ष याचे संवर्धन करूया असा संदेश देण्यात आला.
पंचगंगा नदीच्या आरतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची अनौपचारिक सुरूवात झाली.
येत्या 7 दिवसांत 30 ते 40 लाख लोक यासाठी उपस्थित राहतील, असा विश्वास श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी या लोकोत्सवात मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
सुमंगलम महोत्सवात 28 राज्यांतील भाविकांसह तब्बल 50 देशांतील परदेशी पाहुणे, एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, चार हजार वैदूंचे संमेलन आजपासून (20 फेब्रुवारी) होत आहे.
पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असेल.