अग्निवीर भरती प्रक्रियेत झाला बदल; या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलवलं जाणार आहे.
कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी 10 फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार आहे.
एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे.
join indian army या वेबसाईटवर 11 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
अर्जांची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल.
लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होईल. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या-त्या वेळी वेबसाईटवरून मिळेल.
कोल्हापुरात पार पडलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेचा निकाल 29 जानेवारीला सैन्य दलाच्या वेबसाईटवर जाहीर झाला. भरती प्रक्रियेसाठी 90 हजार ऑनलाइन अर्ज आले होते. त्यापैकी केवळ 536 उमेदवार पात्र ठरले आहेत.