pattankodoli bhaknuk 2022 : पट्टणकोडोलीत अपूर्व उत्साहात बिरदेव यात्रेला प्रारंभ
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील ढोल ताशा काही कैताळाच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. तसेच मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन करण्यात आले.
यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध— प्रदेश, गोवा राज्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.
या तलवारी मिरवणुकीने भानस मंदिर व श्रींचे मंदिरात पूजन करून फरांडेबाबांकडे मार्गस्थ करण्यात आल्या.
यावेळी जमलेल्या लाखो भाविकांनी बाबांच्या अंगावर भंडारा, खारीक-खोबरे, बाळ लोकर यांची उधळण केली.
यावेळी अंजनगाव येथील महाराज खेलोबा नाना देव वाघमोडे फरांडेबाबा यांनी भाकणूक केली.
मेघराजा गैरहंगामी बरसेल, महागाईचा प्रचंड आगडोंब उसळेल, अशी भाकणूक त्यांनी केली आहे.
भूमाता : देशात नदी जोड प्रकल्प उदयास येईल, पूर्वोत्तर राज्यातही समान नागरी कायद्याकडे वाटचाल होईल
बळीराजा : बळीराजाच खरा राजा होईल
सीमावाद : सीमेवरून अनेक देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल
महासत्ता : भारत महासत्तेच्या दिशेनं जाऊन जागतिक नेतृत्वात वेग घेईल
हितसंबंध : बहीण भावात मालमत्तेवरून तंटे होतील
कांबळा : देव मेंडका होऊन निष्ठावान सेवक आणि मेंढीमाऊलीचा रक्षक बनेल