Sammed Shikharji : कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा; सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र राहू देण्याची मागणी
जैन समाजाने आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
जैन धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण होत आहेत या ठिकाणी काही निंदनीय प्रकार घडत आहेत, या सर्वांचा प्रतिबंध करावा यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक मंदिरांचे अध्यक्ष महास्वामी समाजातील मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल.
जैन धर्मियांच्या सर्व तीर्थक्षेत्रांना संरक्षण तसेच तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत जैन समाज धर्मात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
मोर्चानंतर केंद्र सरकारने जर मागणी मान्य केले नाही, तर टप्प्याटप्प्याने मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात येईल.
पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून मोर्चे सुरुच आहेत.
सम्मेद शिखरजी हे धार्मिक स्थळ असल्याचे जैन धर्मियांची भावना आहे.
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे.