Bidri Sakhar KarKhana Result LIVE : एक बिद्री कारखाना अन् सात साखरसम्राटांची प्रतिष्ठा पणाला; कोणाच्या तोंडात 'विजयी' साखर पडणार?
Bidri Sakhar KarKhana Result LIVE : या निवडणुकीमध्ये सत्ताधारी के. पी. पाटील यांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील फुटून विरोधी आघाडीत सामील झाल्याने चुरस आणखी वाढली आहे.
Continues below advertisement
Bidri Sakhar KarKhana Result LIVE
Continues below advertisement
1/10
कोल्हापूर जिल्ह्यात अगदी घराघरात चर्चेचा विषय झालेल्या कागल तालुक्यातील बिद्री साखर निवडणुकीचा निकाल आज येणार आहे.
2/10
या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3/10
रविवारी 89.3 टक्के मतदान झालं. 56,091 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले.
4/10
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 173 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन व अपक्ष चार अशा 56 उमेदवार रिंगणात आहेत.
5/10
सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा दुरंगी सामना या निवडणुकीसाठी रंगला आहे.
Continues below advertisement
6/10
या निवडणुकीमुळे आगामी विधानसभेसाठी सुद्धा बरंच चित्र स्पष्ट होणार असल्याने नेमकं या निवडणुकीमध्ये कोण लै भारी ठरणार? आणि कोणाचा कंडका पडणार? याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे.
7/10
या निवडणुकीसाठी तब्बल सात साखर सम्राट प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
8/10
दोन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन जिल्हाध्यक्ष, गोकुळ अध्यक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
9/10
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी के. पी. पाटील यांना तगडे आव्हान निर्माण झाले आहे. त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील फुटून विरोधी आघाडीत सामील झाल्याने चुरस आणखी वाढली आहे.
10/10
त्यामुळे या निवडणुकीसाठी पूर्णतः विधानसभेची रंगीत तालीम एक प्रकारे पार पडली आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर अशा चार तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे विधानसभेची पेरणी करण्यासाठी सर्वच नेत्यांकडून मोठी ताकद पणाला लावण्यात आली.
Published at : 05 Dec 2023 11:24 AM (IST)