अहमदनगरची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरी; कोल्हापूरच्या अमृताला उपविजेतेपद
कोल्हापुरात झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या अमृता पुजारीला उपमहाराष्ट्र केसरी किताबावर समाधान मानावे लागले.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने दीपाली भोसले-सय्यद चॅरिटेबल ट्रस्टकडून राजर्षी शाहू खासबाग मैदानात स्पर्धा झाली.
उपांत्य फेरीत भाग्यश्री विरुद्ध सांगलीची प्रतीक्षा बागडी यांच्यात लढत झाली.
उपांत्य फेरीत अमृताची कोल्हापूरच्याच वैष्णवी कुशाप्पाशी झाली. ही लढत अमृताने जिंकली.
विजेत्या भाग्यश्रीला पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भाग्यश्रीला चांदीची गदा व चारचाकीची किल्ली सुपूर्द करण्यात आली.
प्रत्येक वजनगटातील विजेत्या पैलवानांना दुचाकी प्रदान करण्यात आली.
दीपाली भोसले-सय्यद यांनी पुढील हिंदकेसरी ठाण्यात घेणार असल्याचे सांगितले.
तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेत्यांना क्लास वन नोकरी द्या, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या स्पर्धेसाठी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांना निमंत्रित केल्याने कुस्ती पंढरीतील रणरागिणींचा कडाडून विरोध केला होता. त्यामुळे बृजभूषण सिंह कोल्हापुरात आलेच नाहीत.