बेळगाव : उंदीरमामाच्या गावाला जाऊया संकल्पनेवर आधारित आगळा वेगळा देखावा
उंदीरमामाच्या गावाला जाऊया संकल्पनेवर आधारित आगळा वेगळा देखावा घरातील गणपती समोर सादर करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंदिरच सगळी गणपतीची तयारी करत आहेत.
उंदराला एसटीचे रूप देऊन समोर एसटीचा लोगो दाखवला होता.
एक उंदीर रांगोळी घालून स्वागताची तयारी करत आहे. आणखी एक उंदीर सजावट करतोय तर आणखी एक उंदीर मोदक तयार करायच्या कामात गुंतला आहे.
उंदरेवाडी गावात गणपती येणार असल्याने गावातील सगळे उंदीर तयारीला लागले आहेत. एक उंदीर गावात चहाचा स्टॉल चालवत आहे.
गणपती आणताना विविध वाद्ये वाजविणारे देखील उंदीरच आहेत.
प्रारंभी निवेदक सांगतो या वर्षी आपल्या उंदरे वाडी गावात गणपती येणार आहे त्यामुळे बिळात कुठे लपून बसला असेल तिथून बाहेर पडा आणि गणपतीच्या स्वागताची तयारी करा.
दोन महिन्यापेक्षा अधिक काळ परिश्रम घेऊन मेणसे कुटुंबीयांनी हा आगळावेगळा देखावा सादर केला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.
गेली एकवीस वर्षे मेणसे कुटुंबीय दरवर्षी वेगवेगळे देखावे आपल्या घरातील गणपती समोर सादर करत आहेत.