कोल्हापूर : आदमापुरात बाळूमामांच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ

रंगपंचमी दिवशी समाधी पूजन, अभिषेक देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागराचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे.

balumama bhandara in adamapur

1/10
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
2/10
महाराष्ट्र- कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून पाहिले जाते.
3/10
रविवारपासून (12 मार्च) यात्रेला प्रारंभ झाला आहे.
4/10
20 मार्चपर्यंत भंडारा यात्रा चालणार आहे.
5/10
रंगपंचमी दिवशी समाधी पूजन, अभिषेक देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
6/10
यावेळी हरी भजन, धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम झाले.
7/10
यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
8/10
पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
9/10
समाधी पूजन, काकडा आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन प्रतिदिन करण्यात आले आहे.
10/10
शनिवारी 18 मार्च रोजी श्रींचा जागर होईल. रविवार 19 मार्च रोजी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होईल.
Sponsored Links by Taboola