Kolhapur News: किल्ले भुदरगडावर आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंगचा आनंद घेता येणार
Kolhapur News: भुदरगड तालुक्यात सुरु झालेल्या साहसी खेळामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Continues below advertisement
Adventure sports can be enjoyed at Bhudargad Fort
Continues below advertisement
1/10
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले भुदरगडावर पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटींग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी या साहसी खेळाचा आनंद घेता येणार आहे.
2/10
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साहसी खेळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
3/10
लहान मुलांसाठी बालोद्यान तसेच गडावरील तलावात पर्यटनासाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
4/10
भुदरगड तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक किल्ले भुदरगडचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येत आहे.
5/10
नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या पॅराग्लायडिंग पर्यटकांना मोठी पर्वणी ठरणार आहे.
Continues below advertisement
6/10
विविध सोयीसुविधांमुळे भुदरगड किल्ला पर्यटकांसाठी आता प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
7/10
भुदरगड तालुका निसर्गसंपन्न तालुका असल्याने पर्यटनाला मोठा वाव आहे.
8/10
वर्षा ऋतुमध्ये तालुक्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात.
9/10
त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
10/10
आता यामध्ये साहसी पर्यटनाची सुद्धा भर पडल्याने पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
Published at : 10 Nov 2025 04:36 PM (IST)