Kolhapur Airport : कोल्हापूर बंगळूर विमानसेवा सुरु; कोल्हापूरला देशातील प्रत्येक शहराला जोडण्याची ज्योतिरादित्य शिंदे यांची ग्वाही
कोल्हापूर - बंगळूर विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे,केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडिक (ऑनलाईन), खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळचे संचालक अनिल शिंदे, उद्योजक कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवासी योगेंद्र व्यास यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला.
ज्योतिरातित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आजवर 155 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून कोल्हापूरचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी यापुढेही इथल्या विमानतळ विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले की, भविष्यात कोल्हापूर मधून अधिकाधिक विमानसेवा सुरु होण्यासाठी तसेच अन्य शहरांना जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
इंडिगोच्या कोल्हापूरमधून सुरु असणाऱ्या विमानसेवांची माहिती देवून यापुढेही विमानसेवा देण्यावर भर देण्यात येईल, असे इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर- बंगळूर विमानसेवा पुन्हा सुरु झाल्याने कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल.
खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना उद्योगपती कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आजवर कोल्हापूर विमानतळासाठी महत्वपूर्ण सहकार्य केले आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर विमानतळाचा सातत्याने विकास होत असून विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती द्यावी.
विमानसेवा कोल्हापूर येथून बंगळूपर्यंत तसेच पुढे कोईमतूरपर्यंत असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी दिली.