PHOTO: लग्नसराईसाठी खरेदीचा विचारात करत असाल, तर सोने-चांदीचे आजचे जर जाणून घ्या!
आता तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे सध्या लग्नसराईच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुम्हीही आज सोने-चांदी (Gold Silver Price) विकत घेण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदीदारांना आज दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सोने आणि चांदीचा भाव आज स्थिर आहे. सोन्याच्या दरात सोमवारी किंचित घट झाली होती.
आज मात्र सोन्याचे दर कायम आहेत. आज, 21 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 61,640 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्यााचा दर प्रति तोळा 56,500 रुपये तर, 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 46,230 रुपये आहे.
24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव आज 61640 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 56,500 रुपये आहे.
याआधी गेले काही दिवस सोन्याच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र, आज सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरच्या या आठवड्यात सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्यानंतर आता त्याचे भाव स्थिरावले आहेत.
मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today) दिल्ली - सोन्याचा भाव 61790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. (Delhi Gold Rate Today)
कोलकाता - सोन्याचा दर 61640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today) चेन्नई - सोन्याचा दर 62230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते.
कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते.
हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते.
सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.