लाडकी बहीण योजनाची e-KYC कशी करायची जाणून घ्या!
माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Continues below advertisement
लाडकी बहीण योजना
Continues below advertisement
1/7
महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
2/7
स्टेप 1: प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या.
3/7
स्टेप 2 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
4/7
स्टेप 3 : e-KYC - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
5/7
स्टेप 4 : आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
Continues below advertisement
6/7
ईकेवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट
7/7
ईकेवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचा फ्लोचार्ट
Published at : 19 Sep 2025 06:12 PM (IST)