Kalyan Shilphata Traffic: कल्याण-शीळ रोडवर भयावह वाहतूक कोंडी; चार ते पाच तास नागरिक अडकले, Photo

Kalyan Shilphata Traffic: कल्याण-शीळ रोडवर 22 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तब्बल 4 ते 5 तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.

Kalyan Shilphata Traffic

1/6
कल्याण-शीळ रोडवर 22 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तब्बल 4 ते 5 तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.
2/6
सदर वाहतूक कोंडीवरुन मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
3/6
कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीला एकमेव कारण आहे ते म्हणजे या रस्त्यावर असलेल्या 3-4 मोठ्या बिल्डरांचे फ्लॅट्स विकले जावे म्हणून सुरू असलेले मेट्रोचे काम. खरंतर 22 किमी लांबीच्या या मेट्रोसाठी कल्याण-शीळ रस्ता सोडला तर मानपाडा प्रिमियर ते तळोजा पर्यंतचे उरलेले 16/17 किमी चे भूसंपादन देखील झाले नाही.अशावेळी फक्त या बिल्डरांच्या फायद्यासाठी स्वत:ला इम्फ्रामॅन संबोधवणारा बबड्या भाऊ हे काम हट्टाने सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या चर्चा आहेत, असं राजू पाटील म्हणाले.
4/6
खरंतर या रस्त्यात तिसऱ्या लेनसाठी बाधीत होणाऱ्या भूमीपुत्रांना मोबदला दिला तर किमान तिसरी लेन ताब्यात घेऊन त्यावर काँक्रीटीकरण करून रस्ता रुंद केल्यास थोडातरी दिलासा मिळू शकतो, परंतु या लोकांनी MMRDA व MSRDC ला पण भिकेला लावली आहे व त्यामुळे मोबदला देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. एकंदरीतच वाहतुक शाखा व पालिका प्रशासन सुद्धा यावर ज्याप्रकारे थंड बसून आहेत त्यावरून त्यांच्यावरही दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे, असं राजू पाटील यांनी सांगितले.
5/6
आता गणपती व नंतर लगेचच नवरात्री व दिवाळी पण येत आहेत ,त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडेल. विद्यार्थ्यांच्या शाळा बुडो की चाकरमानी कामावर उशीरा पोहचो, पाऊस पडून तो लोकांच्या घरात जावो की या वाहतूककोंडीत कोणाचे जीव जावोत, आमच्या इथल्या निगरगट्ट सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही.त्यांना सध्या फक्त इतरांचे पक्ष फोडून पक्ष प्रवेश घेण्यात जास्त रस आहे , मग भले या भयंकर वाहतूक कोंडीत आमच्या माता-भगिनी 4-4 तास अडकून राहिल्या तरी या निर्लज्जांना काहीही फरक पडत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी केली.
6/6
निगरगट्ट सत्ताधाऱ्यांचेही एका अर्थाने बरोबरच आहे,कारण निवडणूकीत जय श्रीराम बोलले की त्यांना मतं मिळतात भले त्यांनी कितीही शेण खाल्लेले असावे,हे त्यांना चांगलेच समजले आहे, असा हल्लाबोलही राजू पाटलांनी केला. आमचे बालकमंत्री बबड्या भाऊ पुढे हतबल आहेत, ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे आता तरी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्यानेच यात लक्ष घालून हे काम किमान दिवाळी संपेपर्यंत बंद ठेवावे अन्यथा यापुढे लोकांना या रस्त्यावर लावलेले पत्रे उखडून फेकून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही,अर्थात त्या लोकांसोबत आम्हीही असूच याची नोंद घ्यावी, असा इशारा राजू पाटील यांनी दिला.
Sponsored Links by Taboola