ST Bus Accident : जालना-पुसद मुंबई एसटीला अपघात; बस 30 फूट खाली कोसळली, 22 जखमी
ST Bus Accident: एका आयशरला ओव्हरटेक करताना एसटी 30 फूट खाली कोसळल्याने अपघात झाला. यात 22 जण जखमी झाले आहेत.
ST Bus Accident : जालना-पुसद मुंबई एसटीला अपघात; बस 30 फूट खाली कोसळली, 22 जखमी
1/11
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या केंदळी फाट्याजवळ एसटी बसला अपघात झाला आहे.
2/11
पुसदवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला 30 फूट खाली कोसळली.
3/11
या अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
4/11
तर तीन प्रवाशांना अधिक उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते.
5/11
केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.
6/11
एसटी चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्या लगत 30 फूट खाली कोसळली असल्याचे म्हटले जात आहे.
7/11
यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं.
8/11
मागील काही महिन्यांपासून एसटीच्या अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
9/11
खराब रस्ते आणि गाड्या खराब यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जात आहे.
10/11
स्थानिक आणि पोलिसांनी जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
11/11
जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
Published at : 08 Aug 2023 10:58 PM (IST)