जालन्यात भीषण अपघात, बाईकस्वाराला चिरडून कंटेनर थेट घरात शिरला, थरारक व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये कंटेनरने दुचाकीला धडक देत घरात घुसतानाचा थरार स्पष्टपणे दिसतो.

Jalna Accident

1/7
जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर गणपती येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला.
2/7
भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि त्यानंतर थेट रस्त्यालगतच्या घरात घुसला.
3/7
या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जीव बचावला असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
4/7
ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू कंटेनर हा भोकरदनवरून जालन्याकडे जात होता.
5/7
राजूर गणपती परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
6/7
या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. त्यानंतर वेगात असलेला कंटेनर थेट रस्त्यालगतच्या घराच्या भिंतीवर आदळला आणि घरात घुसला.
7/7
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जोरदार आवाजाने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा थरार एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Sponsored Links by Taboola