Jayakwad Water discharge : जायकवाडी धरणातून पाण्याचा लोंढा बाहेर पडला, गोदावरी नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं
जालना अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यात पूराचा गंभीर धोका 38 गावे संकटात, 18 हजार नागरिकांचे स्थलांतर
Continues below advertisement
Jayakwad Water discharge
Continues below advertisement
1/8
जायकवाडी धरणातून प्रथमच विक्रमी असा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे, त्यामुळे नांदेडमध्ये सध्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
2/8
18 हजार नागरिकांचे प्रशासनाकडून स्थलांतर. 8 हजार नागरिकांची विविध शाळा महाविद्यालया मध्ये राहण्याची व्यवस्था
3/8
अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील तब्बल 38 गावांना पूराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.अनेक गावांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरले
4/8
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत 3 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होत असून जालना जिल्ह्यातील गोदागाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
5/8
शहरातील अनेक खालच्या भागांत पाणी साचले आहे. त्यामुळे महापालिकेने पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्र उभारली आहेत.
Continues below advertisement
6/8
कालपासून प्रशासनाने सुमारे 18 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यापैकी जवळपास 8 हजार जणांसाठी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांसह 23 ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
7/8
जायकवाडीचा पाण्याचा विसर्ग कमी होईपर्यंत नांदेडमधील पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
8/8
त्यामुळे प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिलेला आहे, याचा गोदावरी नदीच्या काठावरून आढावा घेतलाय
Published at : 29 Sep 2025 12:40 PM (IST)