Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रसिद्ध राजूर गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई, पहाटेपासून बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा
आज वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे. (ड्रोन सौजन्य--दीपक इंगोले ,राजूर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंगारक संकष्ट चतुर्थीसाठी गणपतीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
यामुळे राजुरेश्वर गणपती मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
अंगारक चतुर्थीमुळे रात्रीपासून भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
मध्यरात्री 12 वाजता गणेशाची आरती पूजा करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
आज पहाटे देखील अभिषेक पूजा करून गणपतीची आराधना करण्यात आली
अंगारक संकष्ट चतुर्थीला विदर्भ मराठवड्यासह महराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांचादेखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या मंदिराला आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.