अश्वदेवं... वंशावळ सुरू राहते, म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्यांचे पूजन; चर्चा तर होणारच

अश्वांची पूजन केल्याने वंशावळ सुरू राहते व लक्ष्मी प्रसन्न राहते अशी आख्यायिका आहे, म्हणत जळगावमध्ये एका कुटुंबीयांनी चक्क अश्वांचे पूजन करुन दसरा साजरा केला.

Continues below advertisement

Vijayadashmi horse pujan dasara jalgaon

Continues below advertisement
1/8
अश्वांची पूजन केल्याने वंशावळ सुरू राहते व लक्ष्मी प्रसन्न राहते अशी आख्यायिका आहे, म्हणत जळगावमध्ये एका कुटुंबीयांनी चक्क अश्वांचे पूजन करुन दसरा साजरा केला.
2/8
जळगावत करण्यात आलेल्या या अश्वपूजनाची चर्चा चांगलीच रंगली आहे, यावेळी तीन अश्वांचे पूजन बराटे कुटुंबीयांकडून करण्यात आले. वैदीक मंत्रांचा उच्चार आणि विधीव्रत पूजाही केली.
3/8
या अश्वपूजनाचे महत्त्व असं आहे की, समुद्रमंथनामध्ये जी 14 रत्न निघाली, त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे रत्न म्हणून अश्व होते असे आपल्या धर्म हिंदूमध्ये आहे.
4/8
अश्वपूजनाने वंशावळ सुरू राहते व लक्ष्मी प्रसन्न राहते अशी अख्यायिका असून आज जळगावत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्रमोद बराटे कुटुंबीयांतर्फे अश्वांचे पूजन करण्यात आले
5/8
देशभरात दसऱ्याचा उत्सव साजरा होत असून पारंपरिक पद्धतीने विजयादशमी साजरी केली जाते. कुठे सिमोल्लंघन करुन, कुठे शस्त्र पूजन करुन दसरा साजरा होत आहे.
Continues below advertisement
6/8
कोल्हापूर आणि साताऱ्यातील राजघराण्यातही दसऱ्याची मोठी प्रथा असून पारंपरिक पद्धतीने, राजेशाही थाटात दसरा साजरा केला जातो, तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात.
7/8
यंदाच्या दसऱ्यावर मराठवाड्यातील पूरग्रस्त विदारक स्थितीचे सावट आहे, बळीराजाच्या शेतात पाणी असून शेतकरी आर्थिक संकटात असल्याने यंदाचा दसराही साध्याच पद्धतीने होत आहे.
8/8
दरम्यान, साताऱ्यातील छत्रपती राजघराण्याचा दसरा सीमोलंघन सोहळाही यावर्षी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
Sponsored Links by Taboola