जळगावातील पाचोऱ्यात ढगफुटी, दगड नदीला पूर; निम्म गाव जलमय, उपकेंद्रही पाण्याखाली, पाहा फोटो

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं.

Continues below advertisement

Jalgaon heavy rain water flood

Continues below advertisement
1/8
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातही परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं.
2/8
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावस पडला आहे. मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली गेली.
3/8
गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे, आ. किशोर पाटील यांनी गावास भेट देत मदतीचे आश्वासन दिले आहे.
4/8
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे,
5/8
घाटनांद्राकडेही जोरदार पावसामुळे आलेले संपूर्ण पाणी दगडी नदीतून वाहत गावात घुसले. यामुळे सातगाव डोंगरी येथील ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र, परिसरातील अनेक घरे आणि निम्मं गाव जलमय झाले.
Continues below advertisement
6/8
दगड नदी दोन्ही बाजुच्या किनाऱ्यांनी भरुन वाहू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावचा संपर्कही तुटल्याचं पाहायला मिळालं.
7/8
गावाजवळील सातगाव डोंगरी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले असून, शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे, पण अनेक ठिकाणी जमिनीची माती वाहून गेली आहे.
8/8
अचानक आलेल्या पुरामुळे गोरगरीब ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बराच वेळ गावात पाणी साचून होते, आता प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Sponsored Links by Taboola