Jalgaon Siddhi Mahaganpati : जळगावात देशातील सर्वात उंच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने श्री सिद्धी महागणपतीचं भव्य देवस्थान उभारण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया ठिकाणी देशात कुठेही नाही, एवढी तब्बल 31 फूट उंचीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
374 टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.
दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला.
100 टन एवढे या मूर्तीचे वजन आहे. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला 15 फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत.
आजूबाजूला रिद्धी-सिद्धी असलेले आणि तर श्री गणरायाच्या सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात.
तब्बल 200 किलो वजनाची घंटा सुद्धा याठिकाणी असून ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवण्यात आली. आधी मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर आता मंदिर साकारण्यात येत आहे.
जिल्हाभरातच्या चार ते पाच हजार भाविकांनी लिहिलेली ओम गण गणपतेय नम: अशी मंत्र असलेली तब्बल 21 कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील 18 विद्वानांना बोलावण्यात आलं.