Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल बसला भीषण आग; आगीत बस जळून भस्मसात

Jalgaon Fire Accident : जळगाव जिल्ह्यात जामनेर पहूर मार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Jalgaon Fire Accident

1/5
Jalgaon Fire Accident : जळगाव जिल्ह्यात जामनेर पहूर मार्गावर धावत्या खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
2/5
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून मध्यप्रदेशकडे जात असलेल्या मध्यप्रदेशातील एक खासगी ट्रॅव्हल्स बसला ही आग लागल्याची घटना घडली आहे.
3/5
ही बस जामनेर पहूर रस्त्यावरून जात असताना त्यातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालकाने समय सूचकता दाखवत गाडी जागीच थांबविली आणि काही वेळातच बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळाले.
4/5
मात्र बसमध्ये असलेले प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
5/5
घनतेनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केला असला तरी मोठ्या प्रमाणात बस जळून खाक झाल्याचं पाहायला मिळाले आहे.
Sponsored Links by Taboola