Deep Amavasya: जळगाव: दीप अमावस्या निमित्ताने दिव्यांचे पूजन, पाहा फोटो
आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्यास सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू धर्मात श्रावणास पवित्र महिना मानला जातो. यावर्षी हा अधिक मास आहे.
या महिन्यापासून हिंदू सणांना सुरुवात होते. दीप अमावस्येच्या सणाला सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते.
दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश देतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण त्यामुळे या सणाला दीप अमावस्या असे म्हणतात.
यानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार, 17 जुलै रोजी दीप अमावास्येनिमित्त समयांना साड्या नेसवून मंत्रोच्चारात विधीवत पूजा करण्यात आली.
असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर न्हाऊन निघाला. याप्रसंगी असंख्य भाविकांनी दर्शन घेतले.
मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम यांनी दीप पूजन केले.
तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी मंगल सेवेक-यांसह भाविक उपस्थित होते.