जगवॉर विमानाचे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी अनावरण
भारतातील कारगिल युद्धात वापरलेले बॉम्बर जगवॉर विमानाचे पहिले अनावरण कोकणात..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्यार्थ्यांसह पर्यटकांना पाहता येणार हे जगवॉर बॉम्बर विमान
भारतातील पहिल्या जगवॉर या बॉम्बर विमानाचे आज कोकणात अनावरण करण्यात आले आहे.
फ्रान्स बनावटीचे व भारतीय हवाई दलाने कारगिल युद्धात वापरलेल्या जगवॉर या फायटर विमानाचे आज डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रीडा संकुलाच्या आवारात अनावरण करण्यात आले.
भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या हस्ते फित कापून या विमानाचे अनावरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विमान पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हे जॉगवॉर विमान पाहण्यासाठी गर्दी विर्द्यार्थी पोहचले आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विकास वालावलकर यांच्यासह भारतीय हवाई दलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांसह कोकणात येणाऱ्या पर्यटकांना हे युद्धात वापरलेले जगवॉर विमान अत्यंत जवळून पाहता येणार आहे.
भारतातील पहिल्या जगवॉर या बॉम्बर विमानाचे आज कोकणात अनावरण करण्यात आले आहे. जगवॉर विमानाचे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी अनावरण झाले.