ग्राहकांनी आवडीने खरेदी केलेल्या iPhone 17 ने लोकांना केलं नाराज; नक्की काय झालं?
ॲपलच्या आयफोन 17 मालिकेवर भारतात प्रचंड क्रेझ असून, खरेदी करण्यासाठी प्रत्येक इलेक्ट्रॅानिक उपकरणांच्या दुकाना बाहेर खरेदीदारांची गर्दी झाली. आणि पुढे काय झालं जाणुन घ्या, वाचा पुर्ण बातमी...
Continues below advertisement
iPhone 17 scratchgate
Continues below advertisement
1/8
iPhone 17 मालिकेतील “Scratchgate” हा विवाद सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
2/8
या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे या फोनचे अॅल्युमिनियम फ्रेम आणि कॅमेरा बम्पचा किनारा अतिशय सहजपणे स्क्रॅच होतोय.
3/8
वापरकर्त्यांच्या मते, खिशात चावी किंवा नाणी ठेवताना त्या धातूंचा संपर्क झाल्याने फोनच्या मागच्या भागाला असलेला रंग निघुन जातो.
4/8
विशेषतः Deep Blue, Cosmic Orange आणि Space Black या गडद किंवा ठळक रंगांमध्ये स्क्रॅच अधिक ठळक दिसतात.
5/8
ग्राहकांनी आवडीने खरेदी केलेल्या आयफोन 17 ने मात्र लोकांना नाराज केलं. ही दिवसांतच अॅल्युमिनियम फ्रेमचा रंग उडणे, फोनच्या मागे ओरखडे पडणे असे अनुभव यायला लागले
Continues below advertisement
6/8
तांत्रिकदृष्ट्या, Apple ने टाइटॅनियमपासून बनणारी परत अॅल्युमिनियम ने बनवली आहे. या वादामुळे ग्राहकांना फोन विकत घेतल्यानंतर लगेच एक प्रोटेक्टिव्ह केस वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण खिशात इतर वस्तूंसह फोन ठेवल्याने स्क्रॅच वाढू शकतात.
7/8
काही वापरकर्ते आणि समीक्षक म्हणतात की या समस्या हे केवळ सौंदर्यात्मक आहेत — म्हणजे फोनची कार्यक्षमता प्रभावित होत नाही पण इतर अनेक लोक या कमतरतेवर नाराज आहेत.
8/8
सोशल मीडियावर #Scratchgate ट्रेंड होत आहे आणि विशेषतः Pro आणि Pro Max मॉडेल्सवर सहज चरे पडत असल्याची तीव्र टीका होत आहे.
Published at : 24 Sep 2025 06:47 PM (IST)