Aircraft Crashes : मध्यप्रदेशमध्ये मंदिराच्या कळसाला धडकून विमान कोसळलं, In Pics
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात गुरुवारी (5 जानेवारी) रात्री प्रशिक्षणार्थी विमानाचा (Aircraft) अपघात झाला होता. या अपघातात विमानाच्या पायलटचा (Pilot) मृत्यू झाला तर प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर जखमी झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपघातानंतर दोघांना उपचारांसाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान वैमानिकाचा मृत्यू झाला. उमरी गावातील कुरमियाँ टोला इथे हा अपघात झाला. हे विमान एका मंदिराच्या कळसाला धडकलं आणि अपघात झाला.
रीवामध्ये विमानतळविकसित केलं जात आहे. इथे फाल्कन एव्हिएशन अकादमी अनेक वर्षांपासून वैमानिक प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. अशाच एका प्रशिक्षणाच्या दरम्यान काल रात्री उशिरा विमान मंदिराच्या कळसाला धडकलं आणि अपघात झाला.
कॅप्टन विमल कुमार असं मृत वैमानिकाचं नाव असून सोनू यादव असं गंभीर जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचं नाव आहे.
दाट धुक्यामुळे हा अपघात झाला. विमान रात्री साडेअकरा वाजता उमरी गावातील इंद्रभान सिंह यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर धडकलं आणि नंतर मंदिराच्या कळसाला आदळल्यानंतर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले. यामध्ये प्रशिक्षण देणाऱ्या वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रशिक्षणार्थी पायलटवर संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच डीएसपी उदित मिश्रा, स्टेशन प्रभारी चौराहा अनिमेश पांडे, त्याच स्टेशन प्रभारी सुनील गुप्ता आणि गुढ पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह राठोड घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विमान मंदिराच्या कळसावर न आदळता थेट खाली घरात कोसळलं असतं तर अपघात अधिक गंभीर होऊ शकला असता.