Vishvas Swaroopam : जगातील सर्वात उंच शिवमूर्ती भारतात, 396 फूट उंच 'विश्वास स्वरूपम'; पाहा फोटो
राजस्थानमध्ये भगवान शंकराच्या 369 फुटी उंच प्रतिमेचं लोकार्पण करण्यात येणार आहे. भगवान शंकराची ही प्रतिकृती जगातील सर्वात उंच शंकराची मूर्ती आहे. राजस्थानमधील नाथद्वारा येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उंच शिवप्रतिमेला ‘विश्वास स्वरूपम’ नाव देण्यात आलं आहे. ‘विश्वास स्वरूपम’ प्रतिमेचं लोकार्पण आज होणार आहे. हा कार्यक्रम 29 ऑक्टोबरपासून 06 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या भव्य मूर्ती लोकार्पणाचा कार्यक्रम प्रसिद्ध कथावाचक मुरारी बाप, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या हस्ते पार पडणार आहे.
नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर ही भव्य मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये भगवान शंकर ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसत आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी 10 वर्षे लागली. 2012 साली ही मूर्ती उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे.
संत कृपा सनातन संस्थान द्वारे या भगवान शंकराची ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. या भव्य शिवमूर्तीचं बांधकाम ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन कंपनीने मिळून केलं आहे.
या भव्य मूर्तीमध्ये लिफ्ट, जिने, हॉल बांधण्यात आला आहे. या मूर्तीचे काम पूर्ण होण्यासाठी 10 वर्षे लागली. यासाठी 3000 टन स्टील आणि लोखंड तसेच 2.5 लाख घन टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे.
ऑगस्ट 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मुरारी बापू यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर आता या मूर्तीचं लोकार्पण करण्यात येणार आहे. नाथद्वारामधील 'विश्वास स्वरूपम' मूर्तीचं हे ठिकाण उदयपूर शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे.
या मूर्तीमध्ये चार लिफ्ट आहेत. या लिफ्टच्या साहाय्याने तुम्हाला 270 फुट उंचीवर जाऊन शंकराच्या डाव्या खांद्यावरील त्रिशूळवरून पाहता येईल. 369 फुट उंट या मूर्तीमध्ये एका वेळी सुमारे 10 हजार लोक राहू शकतात.
विश्वास स्वरूपम मूर्ती जगातील सर्वात उंच शिवमूर्ती असून तिची उंची 396 फूट आहे.