In Pics | 'मी प्रचारासाठी पुन्हा येईन'... ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना संदेश
Mamata Banerjee
1/7
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीएम ममता पुढील दोन-तीन दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असणार आहेत.
2/7
एसएसकेएम हॉस्पिटलने सांगितले की, ममता बॅनर्जी यांना 48 तासांच्या वैद्यकीय निरीक्षणामध्ये ठेवण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्या वारंवार डिस्चार्जसाठी आग्रह करत होत्या.
3/7
ममता बॅनर्जी यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत, त्या आता थोडीशी हालचाल करू शकतात. मात्र, ममता यांना व्हील चेअर वापरावी लागणार आहे
4/7
बुधवारी संध्याकाळी नंदीग्राममध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
5/7
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी रुग्णालयाच्या बेडवरुन प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, काही दिवसांत त्या प्रचारासाठी परत येतील आणि गरज पडल्यास व्हील चेअरचा वापर करतील. त्यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.
6/7
ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान चार-पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ढकलले तसेच कारच्या दरवाजाला दणका दिला ज्यामुळे त्या जखमी झाल्या.
7/7
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला, कमरेला, खांद्याला आणि मानेला दुखापत झाली आहे.
Published at : 13 Mar 2021 08:21 AM (IST)