Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vande Bharat Express: 180 किमी प्रति तास वेगाने धावली वंदे भारत एक्स्प्रेस; पाहा आतील फोटो
भारताची पहिली हाय स्पीड ट्रेन वंदे भारतने आपल्या चाचणीत नवा विक्रम रचला. चाचणीमध्ये वंदे भारत ट्रेनने 180 किमी प्रति तास इतका वेग गाठला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोटा विभागात वंदे भारत एक्स्प्रेसच्या अनेक चाचण्या पार पडल्या आहेत.
या ट्रेनची पहिली चाचणी कोटा आणि घाट का बरना, दुसरी चाचणी घाट का बरना आणि कोटा दरम्यान पार पडली. त्याशिवाय तिसरी चाचणी कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान झाली. चौथी आणि पाचवी चाचणी कुर्लासी ते रामगंज मंडी आणि सहावी चाचणी कुर्लासी ते रामगंज मंडी दरम्यान पार पडली आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये स्वयंचलित दरवाजे असून वातानुकूलित कार कोच आहेत. या ट्रेनमधील खुर्ची 180 अंशात फिरवता येऊ शकते.
त्याशिवाय जीपीएस आधारीत माहिती यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारीत बायो टॉयलेटदेखील आहेत.
या ट्रेनमधून प्रवास करणे आरामदायी अनुभव असणार आहे. ट्रेनमध्ये तीन तासांचा पॉवर बॅकअप आहे. वीज पुरवठा खंडित झाला तरी ट्रेनमध्ये वीज असणार.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 74 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरमहा दोन ते तीन वंदे भारत एक्स्प्रेस तयार केल्या जात आहेत. काही कालावधीनंतर ही संख्या दरमहा 6 ते 7 वर आणण्यात येणार आहे.
पुढील वर्षापर्यंत 75 हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तयार करण्यात येणार आहे.
याआधी वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कतरा आणि नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात येत आहे.