Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Vande Bharat Train : पंतप्रधान मोदी आणखी एका राज्याला वंदे भारत ट्रेनची भेट देणार, पाहा ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक
Vande Bharat Train : आज देशाला आणखी एका वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आज सोळाव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKerala Vande Bharat Express: आज PM मोदी पहिल्यांदाच केरळला वंदे भारत ट्रेन भेट देणार आहेत. केरळला मिळणारी ही पहिली वंदे भारत ट्रेन असणार आहे.
आज म्हणजेच मंगळवार 25 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान तिरुवनंतपुरममध्य रेल्वे स्थानकावरुन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारत ट्रेन केरळमधल्या एकूण महत्वाच्या 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे.
तिरुअनंतपुरम व्यतिरिक्त ही ट्रेन कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, थ्रिसूर, तिरूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या स्टेशन्सवर थांबणार आहे
लोकांच्या सोयीसाठी ही वंदे भारत ट्रेन एकूण 14 महत्वाच्या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. ही ट्रेन 26 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
ट्रेनच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनीही ट्विटरवर ट्रेनबाबत माहिती देत आनंद व्यक्त केला.
तिकीटाच्या भाड्याबद्दल सांगायचे तर, तिरुअनंतपुरम ते कासारगोड दरम्यान चेअर कार क्लाससाठी तुम्हाला 1,590 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2,880 रुपये मोजावे लागणार. दुसरीकडे, कासरगोड ते तिरुअनंतपुरमसाठी, चेअर कारमध्ये 1,520 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2,815 रुपये शुल्क मोजावे लागेल.
तिरुअनंतपुरम येथून सकाळी 5.20 वाजता निघून दुपारी 1.25 वाजता कासारगोडला पोहोचेल. यानंतर कासारगोड येथून दुपारी 2.20 वाजता निघून संध्याकाळी 10.35 वाजता तिरुअनंतपुरमला पोहोचेल. ही वंदे भारत ट्रेन 586 किलोमीटरचे अंतर 7 तासात पार करेल.