Vande Bharat Express Accident: 'वंदे भारत'ची म्हशीच्या कळपाला धडक, एक्स्प्रेसचं झालं नुकसान, पाहा फोटो
मोठ्या थाटामाटात गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंदे भारत एक्स्प्रेस ही भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे.
भारतातील सर्वात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या या ट्रेनचा वेग ताशी 180 किमी आहे, परंतु सध्या ती 130 किमी प्रतितास वेगाने धावते.
मुंबई सेंट्रलवरुन गुजरातच्या गांधीनगरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने म्हशींच्या कळपाला धडक दिली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही धडक झाली.
वंदे भारत ट्रेन वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत होती.
त्याचवेळी अचानक म्हशींचा कळप रेल्वे ट्रॅकवर आला आणि ही जोरदार धडक झाली.
यात एक्सप्रेसचा पुढचा भाग अक्षरश: तुटून पडला आहे.
या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
या घटनेत ट्रेनचं थोडं नुकसान झालं आहे मात्र वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही. सर्व ट्रेन्स आपल्या निश्चित वेळेमध्ये धावत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
गुजरातमध्ये गायी आणि म्हशीपालन करणाऱ्या लोकांना वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकाची माहिती नसल्याने म्हशींचे कळप रुळांवर आले. आता त्यांना जागृत करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.