PM Modi Uttarkashi : पंतप्रधान मोदींचा बोगद्यातून बचावलेल्या मजुरांशी संवाद, फोन करून तब्येतीची विचारपूस
उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात 17 दिवस अडकलेले 41 मजूर अखेर मंगळवारी सुखरुप बाहेर आले आहेत. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांशी फोनवरून संवाद साधला. (Image Source : PTI)
पंतप्रधान मोदी यांनी 41 कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना प्रोत्साहनही दिलं. (Image Source : PTI)
त्याआधी पंतप्रधानांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत संवाद साधला आणि कामगारांना बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. (Image Source : PTI)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांचे कौतुक करताना म्हटलं की, 'बाबा केदारनाथने तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिला आहे. संकटाच्या वेळी तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन दिलं. तुमच्या कुटुंबीयांनीही आम्हाला पाठिंबा दिला. हे रेस्क्यू ऑपरेशन माणुसकीचे आणि टीमवर्कचे अप्रतिम उदाहरण आहे.' (Image Source : PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून कामगारांच्या सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन केलं. (Image Source : PTI)
यावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांकडून कामगारांच्या आरोग्याची माहिती घेतली. कामगारांची आरोग्य तपासणी केली जाईल, असं मुख्यमंत्री धामी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. (Image Source : PTI)
बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या मजुरांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Image Source : PTI)
सर्व 41 मजुरांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, 17 दिवस बोगद्यात अडकल्यामुळे काही दिवस त्यांच्या प्रकृतीची देखरेख केली जाणार आहे. (Image Source : PTI)
41 मजूर 17 दिवस बोगद्या अडकले होते. 12 नोव्हेंबरला ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे 41 कामगार बोगद्यामध्ये अडकले होते. (Image Source : PTI)
देश-विदेशातील तज्ज्ञ आणि अभियंते यांच्यासह भारतीय लष्कराने बचावकार्य रावबत सर्व 41 मजूरांची यशस्वीपणे सुटका केली. बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. (Image Source : PTI)
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर सर्व कामगारांना थेट चिन्यालीसौर येथील रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिथे त्यांची आवश्यक आरोग्य तपासणी केली जाईल. (Image Source : PTI)
तसेच कामगारांच्या कुटुंबीयांनाही चिन्यालीसौर येथे नेण्यात आले आहे तेथून त्यांना त्यांच्या सोयीनुसार घरी सोडण्याची पूर्ण व्यवस्था राज्य सरकार करेल, अशी माहिती दिली. (Image Source : PTI)