Tulip Garden Srinagar: श्रीनगरचं ट्युलिप गार्डन पर्यटकांनी फुलले, 32 दिवसांत साडे तीन लाख पर्यटकांची भेट
काश्मीरमध्ये नवा पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगार्डन खुले झाल्यानंतर 32 दिवसांत येथे 3.7 लाख पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक विदेशी पर्यटक होते
यंदा एप्रिलअखेरपर्यंत हे उद्यान पाहण्यासाठी सुमारे पाच लाखांवर पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे.
सध्या विविध प्रजातींची16 लाख फुले फुलल्याचे दिसते.
ट्युलिप गार्डनमध्ये यंदा 68 प्रकारच्या ट्युलिप्सची लागवड करण्यात आली आहेत. त्यापैकी चार नव्या जातीचे ट्यूलिप्स नेदरलँड येथून आणण्यात आले आहे.
ट्युलिप गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात.
ट्युलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.
उद्घाटनच्या कार्यक्रमाला परदेशातील देखील पर्यटक उपस्थित होते.
ट्युलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे.
पूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते.