India In Pics : या आठवड्यातील भारत फोटोंमध्ये पाहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाची खास बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी (4 ऑगस्ट) मोठा दिलासा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत लोक रांगेत उभे होते. पंतप्रधान मोदींनीही आपली वाट पाहणाऱ्या लोकांना हस्तांदोलन करून सर्वांचे अभिवादन स्वीकारलं.
चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल.
इस्रोने श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून सिंगापूरचे सात उपग्रह प्रक्षेपित केले. हे प्रक्षेपण 44.4 मीटर लांबीच्या PSLV-C56 रॉकेटने लाँच करण्यात आलं आहेत.
भारताच्या विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
देशातील डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
देशातील मैदानी भागात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशातील मैदानी भागात भात पेरणी सुरू आहे. मान्सून असाच राहिला, तर यंदा चांगले पीक येईल, असा अंदाज बांधता येईल.
पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप रविवारी (6 ऑगस्ट) सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे.